Header Ads

सातारच्या बॅडमिटन पटू वैशाली विनायक आगाशे यांची जागतिक वरिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड satara

सातारा : येथील एल आय सी ऑफ इंडियाच्या सातारा विभागीय कायर्ंालयाच्या खेळाडू वैशाली विनायक आगाशे यांची महिला दुहेरी विभागात पोलंड येथे होणार्‍या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या वरिष्ठंाच्या बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत 50 वर्षे वयोगटातील महिला दुहेरी विभागात ही निवड करण्यात आली आहे. या स्पधर्ंेत आगाशे या भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेंत. या जागतिक स्तरावरील पोलंड येथे होणार्‍या स्पर्धा दि. 4 ते 12 ऑगस्ट 2019 दरर्मंयान संपन्न होणार आहेत. वैशाली आगाशे या गेली 29 वर्षे भारतीय आयुर्विमा महामंडळात खेळाडू म्हणून कायर्ंरत आहेत. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पधार्ंत भाग घेउन यश संपादन केलेले आहे. जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. 2013 साली टर्की येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी महिला दुहेरी आणि मीश्र दुहेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातर्फे मान मिळवलेल्या त्या पहिल्या खेळाडू असल्याचे सातरा जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे प्रमुख श्री. छ. शिवाजीराजे भोसले यांनी सांगितले तसेच संघटनेतर्फे वैशाली आगाशे यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनोज कान्हरे सचिन देशमुख उपस्थित होते. 

No comments