Header Ads

वृक्ष लागवड लोकचळवळ झाली पाहिजे : खा. उदयनराजे satara

सातारा : वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पर्यावरणाचे संतुलन दिवसेंदिवस बिघडत चालले आहे त्याच्या झळा आता मानवाला बसू लागले आहेत. अशाच पद्धतीने आणखी काही वर्ष परिस्थिती राहिल्यास माणसाला जगणे मुश्कील होईल वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे तरच पुन्हा पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन आटोक्यात आणण्यात येईल यासाठी सातारा नगरपालिकेने वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे. उद्याने ही शहरांची हृदय आहे. आबालवृद्धांसाठी विरंगुळा चे ठिकाण आहे सातारा शहरातील बागांचे काम हाती घेतले गेले आहे असे प्रतिपादन खासदार श्री.छ.उदयनराजे यांनी केले येथील छत्रपती शाहू उद्यानामध्ये पत्रकार पांडुरंग पवार आणि नगरपालिका कर्मचारी बाळू शिंदे यांच्या स्मृत्यर्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भारती- झुटिंग, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, राजन कदम, दत्तात्रय चाळके, यशवंत घोरपडे, अस्लम बागवान, दादा मोने, सुरेश माने, रवी क्षिरसागर, विवेक जाधव,  देविदास चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, राहुल माने, रमेश काळे, नितीन सुपेकर, विजय केसकर, मदन देवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. शाहू वासियांना जास्तीत जास्त नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी माझा प्रयत्न राहील शहरातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी कास धरणाची उंची वाढविली. भविष्यात जास्तीत जास्त पाणी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कासमध्ये पाण्यासाठी पावसाची गरज आहे. यासाठी पर्यावरणाचे संतुलन महत्त्वाचे आहे. वृक्ष लागवड झाली तरच पावसाचे प्रमाण वाढेल आणि अलीकडच्या काळात ज्या समस्यांना तुम्हा सर्वांना तोंड द्यावे लागते. तो प्रश्न संपुष्टात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. काही माणसे  समाजाला दिशा  देण्याचे काम करतात त्यांच्या पश्चात त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भारती- झुटिंग यांनी पत्रकार पांडुरंग पवार आणि बाळू शिंदे यांच्या नावाने वृक्ष लागवड केल्याने त्यांच्या स्मृती  कायम जागृत रहातील. असे सांगून महाराज म्हणाले, उद्याने ही शहरांचे वैभव असते आबाळ वृद्धांचे ते विरंगुळ्याचे ठिकाण असते. शहरातील सर्वच बागां सुसज्ज करण्यासाठी माझे प्रयत्न राहतील प्रत्येक बागेत अत्याधुनिक खेळणी बसवली जातील. ज्येष्ठांना चालण्यासाठी चांगल्या पद्धतीचे ट्रॅक बनवले जातील. अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी उदयनराजे यांच्या हस्ते आंबा, चिकू, रामफळ, देवचाफा, सोनचाफा या वृक्षांचे रोपण करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.

No comments