Header Ads

साताऱ्यात रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन satara

सातारा : निरा-देवधरच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने शनिवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. रामराजेंनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती म्हणून टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर रामराजेंनी टीका केल्यानंतर उदयनराजेंचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पोवई नाका येथे रामराजेंच्या पुतळ्याचे दहन केले.

फलटण येथे रामराजेंनी घेतलेल्या पत्रकार परिषेदेत उदयनराजे यांच्यावर टीका करताना, उदयनराजेंना स्वयंघोषित छत्रपती म्हणून संबोधले होते. तसेच उदयनराजे यांचा चक्रम असे उल्लेख केला होता. त्यांनतर उदयनराजेंचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, छत्रपतींबाबत सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यात कोणीही अपशब्द वापरल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दोन्ही राजेंच्या वादामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

No comments