Header Ads

मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुखांकडून नरेंद्र पाटील यांचा सत्कार satara

सातारा : शिवसेनेचा ५३ वा वर्धापनदिन शीव येथील षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला. या वर्धापन दिन सोहळ्यात  राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघात खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांना टक्कर देत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील ४ लाख ४६ हजार ६९२ इतकी मते मिळवली होती. त्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नरेंद्र पाटील यांचा व शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांचा तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने दाखल झालेल्या मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई येथील ५३ व्या वर्धापनदिन सोहळ्याला शिवसेनेचे मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. 

No comments