Header Ads

जिल्ह्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या satara

सातारा : राज्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या गृह विभागाने केल्या. यामध्ये जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर जिल्ह्याबाहेरील दोन अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत. जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुढील प्रमाणे, सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांची सोलापूर ग्रामीण, सातारा शहर पोलीस ठाण्याचे श्रीकांत पोरे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची जि.सांगली, नियंत्रण कक्षातील बाळासाहेब भरणे यांची गडचिरोली, तळबीड पोलीस ठाण्याच्या वैशाली पाटील यांची गोंदीया, कराड शहरच्या पुष्पा किर्दत यांची, मुंबई शहर, बाळशिराम शिंदे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ, महेंद्र निंबाळकर यांची मुबंई शहर, लोणंद पोलीस ठाण्याचे गिरीष दिघावकर यांची सीआयडी, पुणे, ज्योतीराम पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाणवीज व  दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रवीण पाटील यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे. तसेच जिल्ह्यात नव्याने दाखल होत असलेले नितीन माने यांची सांगलीहून जिल्हा जातपडताळणी कार्यालयात तर मारूती सराटे यांची मुंबई शहरातून सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली आहे.

No comments