Header Ads

अजिंक्यतारा सूत गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव नावडकर, व्हा. चेअरमनपदी बळिराम देशमुख बिनविरोध satara

सातारा : वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव विठोबा नावडकर तर व्हाईस चेअरमनपदी बळिराम पिलोबा देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी पी.डी.गदगे, वस्त्रनिरीक्षक, सोलापूर हे होते. या निवडीबद्दल दोघांचेही सूत गिरणीचे मार्गदर्शक संचालक आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या चेअरमनपदासाठी उत्तमराव विठोबा नावडकर यांचे नाव विष्णू लक्ष्मण सावंत यांनी सुचविले तर अनुमोदन सुरेश वसंतराव टिळेकर यांनी दिले. व्हाईस चेअरमन पदासाठी बळिराम पिलोबा देशमुख यांचे नाव जगन्नाथ हणमंत किर्दत यांनी सुचविले तर अनुमोदन सौ. साधना जयवंत फडतरे यांनी दिले. विहीत मुदतीत इतर कोणाचेही अर्ज दाखल न झालेने अध्यासी अधिकारी यांनी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक अशोक काठाळे, गणपतराव मोहिते, आबासो साबळे, भरत कदम, विकास शिंदे, रघुनाथ जाधव, उल्हास भोसले, सुनिल देशमुख, भगवान शेडगे उपस्थित होते. सूत गिरणीच्या प्रगतीचा आलेख चढता असून अल्पावधीत या संस्थेने मोठी भरारी घेतली आहे. नवनविचित पदाधिकारी आणि संचालक मंडळ सूत गिरणीच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी आदर्शवत कामकाज करतील, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments