Header Ads

१३ जून रोजी प्रभाग क्र.७ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपचा कार्यक्रम satara

सातारा : सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे मित्र समूहाच्या वतीने १० वी व १२ वी च्या परीक्षेत यश मिळावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील अंगणवाडी ते इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. खा.श्री.छ.उदयनराजे भोसले व आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पाटप करण्यात येणार आहे. गुरुवार दि. १३ रोजी मल्हार पेठेतील गणेश चौकात सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे मित्र समूहाच्या वतीनेे करण्यात आले आहे.

No comments