Header Ads

जनाधार नसलेल्या आ.जयकुमार गोरेंना भाजपात घेवू नये : डॉ. महादेव कापसे satara

म्हसवड : आमदार जयकुमार गोरे यांचा जनाधार राहिला नसल्यामूळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत, म्हणून ते भाजपाच्या प्रवेशासाठी धडपडत असून जनाधार नसलेल्या आ. गोरेंना भाजपाने पक्षात घेवू नये,  असे स्पष्ट मत भाजपाचे  मण - खटाव विधानसभा आध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले.  दरम्यान आ. गोरे यांना भाजपात प्रवेश देवू नये, असा ठराव यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांच्या  बैठकीत एकमताने करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक दहिवडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी आ. जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, उपाध्यक्ष विजयकुमार साखरे, ज़िल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे,पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.उज्वल काळे,सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष जालिंदर खरात, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष विजय टाकणे, अशोक  पवार, संतोष हिरवे, सचिन लोखंडे, वसंत शिर्के ,पिंटू जगदले,हानमंत तरटे,बापुराव नलवडे,पोपट कालेल,बालेखान मुलानी,आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कापसे बोलत होते. ते पुढे म्हणाले, जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरु आहे. त्याठिकाणी त्यांनी उत्मात घातला असल्याने त्यांच्या अनेक निकटचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षात, लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपात घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणार्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आ. गोरे यांना पक्षात घेवू नये.  ज्या उमेदवारावर विनयभंग, बलात्कार, फसवणुकीसारखे गंभीर  गुन्हे दाखल आहेत, त्या उमदेवारास पक्षाने तिकिट देवू नये.  सामान्य माणसाला तिकीट दिले तरी आम्ही स्वखर्चाने त्या उमेदवारास निवडून आणणार आहे.  ज्याला पक्ष तिकीट देईल त्यांचे मनापासून काम करून निवडून आणू. मात्र चूकीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही साथ देणार नाही.  कुठेही भाजपाच्या कार्यकर्त्याला डावलणार नाही. भाजप ने माणच्या 32 गावांना पाणी मागणी केली आहे, भाजपाच पाणी देणार आहे. केवळ आयत्या कामाचे श्रेय घेण्याचे काम आ. गोरे करत आहेत. काँग्रेसच्या सतेच्या काळात त्यांनी उतर भागावर अन्याय केला आहे. आता सगळ्या भाजपा कार्यकर्त्यांचा त्यांच्या प्रवेशाल विरोध असल्याचे डॉ. कापसे म्हणाले.

अनिल देसाई, म्हणाले, विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत व मूळ कार्यकर्ते डावलेले जाऊ नयेत. सामान्य भाजपा कार्यकर्ते हे पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सन्मानासाठी आयात नेत्यांना तिकीट देऊ नये. सगळ्या पदाधिकार्‍यांनी एकत्रितपणे आयाराम, गयाराम ला विरोध करावा. रावण हा रावण आहे. रावण हा कधीच राम होत नाही. अशा रावण प्रवृतीला आमचा ठाम विरोध आहे. चिमणीला प्यायला पाणी नव्हते, अशा माणच्या दक्षिण भागात ओढ्यातून भाजपा च्या पाणी वाहत आहे. जोवर पाणी कोयनेतून टेम्भु साठी चालू आहे तो वर माणचे पाणी बंद होत नाही. पदासाठी मी भाजपात आलो नाही, मी फक्त माणचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी आलो आहे. पक्षात येतील त्यांचे स्वागत आहेच, पण भाजपात येऊन दंडेलशाही करण्यासाठी येणार्‍याला थांबवले पाहिजे.  सहा जि.प.गटात आमदार गटाचे उमेदवार पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. आता आ. जयकुमार गोरे यांचा जनाधार संपला आहे. जनाधार नसलेल्या आमदारांना भाजपात घेऊन पक्षाचे नुकसान करू नये. लोकसभेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वच गटात विरोधात काम केले. त्यामुळे टिमकी वाजवू नये, खासदारांच्या विजयाचे सगळे श्रेय तुम्ही  घेऊ नये. भाजपाच्या कार्यकर्त्यांनाच तिकिट दिले तर आम्ही निवडून आणू. युतीला जरी तिकिट दिले तर आम्ही काम करु पण या आयाराम रावणाचे काम करणार नाही. माझ्याकडे सगळे व्हिडीओ आहेत, ते योग्य वेळी दाखवू, असेही अनिल देसाई म्हणाले.विजय साखरे, म्हणाले, लोकसभेत आम्ही काम केले अन्  आ. जयकुमार गोरे याचे श्रेय घेत आहेत. आमदार गोरे यांनी पाठिंबा देऊन लोकसभेच्या निवडणुकीत मते वाढली नाहीत. केवळ मोदी मूळे लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला. त्यांना काँग्रेसने तिकीट दिले तर ते हारणारच आहेत. पराभव दिसत असल्याने आ. जयकुमार गोरे भाजपात प्रवेश करण्यासाठी धडपत आहेत. त्यांची लोकप्रियता संपली आहे. वातावरण त्यांच्या विरोधात आहेत. जर त्यांना तिकीट दिले तर भाजपाचे मोठे नुकसान होणार आहे.

बाळासाहेब खाडे, म्हणाले, केवळ आयत्या लाटेवर स्वार होणे व परिस्थितीचा लाभ घणे हेच आमदार जयकुमार गोरे यांचे काम आहे. खासदार निवडून फक्त त्यांच्या मुळेच आला नाही. उलट मते कमी झाली आहेत.हे मि विस्तारक आसलेने पक्ष चे नेते ना सागणार आहे. जालिंदर खरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते डावलले होते. अनेकांना पोलिंग एजंट सुध्दा नेमले नाहीत, विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी पक्षपातीपणा करुन फक्त आमदार गटाच्या कार्यकर्त्यांंनाच फॉर्म दिले. आयाराम गयाराम हे तालुक्यातील भाजपात ढवळाढवळ करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत २५० आमदार हे युतीचे निवडून येणार आहेत. या आयाराम ला आवर घाला. भाजपच्या मूळ निष्ठावंतांना डावलले जाऊ नये, भाजपा तालुक्यात ज्यांनी वाढवली, त्यांना संधी मिळावी. प्रा. विश्‍वंभर बाबर ,म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत निष्ठावंतांना डावलले जाऊ नये, नवीन येणार्‍यांना तिकिट पक्षाने देऊ नये. लोकसभेत ज्यांनी एकनिष्ठ काम केले, अनिल देसाई यांनी माण दक्षिण भागातील सोळा गांवाना दिले, टिआरपी वाढविणार्‍या आ. जयकुमार गोरे यांना तिकिट देऊन भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय पक्षाने करु नये. भाजपाची लाट असल्याने आता संधीसाधू लोकांना पक्षाने दूर ठेवावे. भाजप च आमदार निवडून येणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार निवडून आणला हे दाखवून देत आहेत. सगळीकडे मिरवत आहेत. लग्नाची बाहेर व ठेवलेली घरात,अशी माण ची अवस्था झाली आहे. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावलू नये.  माण तालुक्यातील पाण्याचे बघा,  बाराबतीचे पाणी रोकले ठिक आहे, पण, माण तालुक्यातील पाण्यासाठी काय केले? नैतिकता हरविलेल्या व जमीन घोटाळ्यात अडकलेल्या आमदारांना पक्षात घेऊन पक्षाचे नुकसान करु नये, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. उज्वल काळे म्हणाले, भाजपात येणार्‍या माणच्या प्रतिनिधीला विरोध करावा, आयात उमेदवारांना भाजपात तिकीट देऊ नये, भाजपाच्या कार्यकर्त्यांना डावलणार्‍यांना पक्षात घेऊ नये. नरवणे उपसरपंच जगदाळे, म्हणाले,एकत्रित पणे सगळ्यांनी लढावे. देवकर म्हणाले, आम्ही अनिल देसाई यांच्या पाठिशी आहोत. संतोष हिरवे म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या भाजपाच्या प्रवेशाला भाजपा युवा मोर्चा पदाधिकारीकार्‍यांचा ठाम विरोध आहे.

डॉ. महादेव कापसे, यानी आमदार जयकुमार गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये , असा ठराव मांडला. या ठरावाला   प्रा. विश्‍वंभर बाबर यांनी अनुमोदन दिले. सर्वांनी हात उंच करून संमती दिली. हा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. यावेळी पदाधिकार्‍यांनी एकजुटीने ठराव संमत केला. प.स. सदस्य तानाजी काटकर यांनी आभार मानले. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते कै.अशोकराव शानभाग यांचे नुकतेत निधन झाले, त्यांना भाजपाच्या कार्यालयात श्रध्दांजली वाहण्यात आली.

No comments