Header Ads

टंचाईच्या काळात संवेदनशिल राहून कामे करा : संजीव नाईक-निंबाळकर satara

सातारा : सध्याची टंचाई ही तीव्र स्वरुपाची टंचाई आहे. या टंचाईच्या काळात सर्व अधिकाऱ्यांनी संवेदनशिल राहून काम करावे, अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. माण व खटाव तालुक्यातील टंचाई आढावा बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, माणच्या तहसीलदार अर्चना पाटील, खटावच्या तहसीलदार माने आदी उपस्थित होते.

माण व खटाव तालुक्यामध्ये सुरु असलेल्या चारा छावणीतील जनावरांना बारकोडींग करुन ऑनलाईन हजेरी घ्यावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, सर्व जनावरांचे बारकोडींग येत्या दोन दिवसात पूर्ण करावे.   टंचाईच्या उपाययोजनांसाठी टँकरच्या खेपा १०० टक्के पूर्ण करा. तसेच वाढत्या टंचाईची परिस्थिती लक्षात घेवून आलेल्या टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा. चारा छावणींच्या नवीन प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करुन चारा छावण्या सुरु करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केल्या. या बैठकीला  विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

No comments