Header Ads

डोळेगाव येथील बालकाचा मृत्यू satara

सातारा : सातारा तालुक्यातील डोळेगाव येथील दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू काहीतरी चावल्याने झाला. विराज संभाजी जाधव असे बालकाचे नाव आहे. विराज शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत होता. यावेळी त्याला काहीतरी चावल्याचे लक्षात येताच कुटुंबातील व्यक्तिनी त्याला तत्काळ उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. येथे त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

No comments