Header Ads

फलटणच्या रामराजेला अज्ञानी लोक 'भगिरथ' म्हणतात ; मात्र भगिरथाने मंत्रीपदासाठी आई-माती उपाशी ठेवली : आ. जयकुमार गोरे satara

सातारा : फलटणच्या रामराजेला अज्ञानी लोक भगिरथ म्हणतात. मात्र याच भगिरथाने मंत्रीपदासाठी सातारा जिल्ह्यातील आई-माती उपाशी ठेवली व धरणाचे पाणी दुस-याला दिले, असा गंभीर आरोप करुन प्रत्येक गोष्टीला उत्तर देणारे रामराजे नाईक-निंबाळकर तथा भगिरथ आहेत कुठे ? रामराजेला दाखवा आणि १०१ रुपये मिळवा, अशी जाहिरात करण्याची वेळ आल्याचे आ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत नाव घेवून रामराजेंवर टीका केली. कोयना, कण्हेर, धोम-बलकवडी, वांग, उरमोडी, तारळी, नीरा-देवधर अशा धरणांतून सातारा जिल्ह्यात २२५ टीएमसी पाणी अडविले जाते. यापैकी जिल्ह्याच्या वाट्याला किती टीएमसी पाणी येते, याचा आता विचार करण्याची वेळ आली आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी आपली सत्ता टिकविण्यासाठी धरणग्रस्तांची चेष्टा करुन दुस-या जिल्ह्याला पाणी दिलेले आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना पाण्यापासून त्यांनी वंचित ठेवले आहे. भूमिपूत्रांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका घेवून सातारा जिल्ह्यातील जनता आता पेटून उठली आहे. टेंभू योजनेतून २२ टीएमसी पाणी कडे गाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठे महांकाळ, सांगोला येथील २४0 गावांना देण्यात येते. ८0 हजार ४७२ हेक्टर क्षेत्र या पाण्याने ओलिताखाली येते. ज्या सातारा जिल्ह्यात धरणे व योजना आहेत, तेथील फक्त तीन गावांना 0.१७ टीएमसी पाणी मिळते. उर्वरित पाणी इतरांना दिले जाते. सातारा जिल्ह्यात दुष्काळग्रस्तानी टैंकरने पाणीपुरवठा केला जात असताना पुणे, सोलापूर, सांगलीला पाणी देणाच्या राज्यकर्त्यांना जनता आता कंटाळली असून त्यांना जाब विचारण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. सत्य उघड होण्यासाठी काही काळ जावा लागतो. आज लोकांना सत्य समजू लागल्यामुळे भगिरथाचा उल्लेख आता कोरडा नाला, असा करावा लागल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे आ.जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

No comments