Header Ads

अभयारण्य क्षेत्रात धनदांडग्याकडून अतिक्रमणे ; शासनाकडून १५ दिवसात कारवाई न झाल्यास जनताच टिकाव-खोरी घेऊन कारवाई करेल : डॉ.भारत पाटणकर satara

सातारा : सातारा जिल्ह्यातील अभयारण्याच्या नियंत्रण क्षेत्रात धनदांडग्याकडून अतिक्रमणे व बेकायदा खरेदी व्यवहार झाले आहेत. अभयारण्य क्षेत्रात भांडवलवाले व्यावसायिक, पवनचक्की कंपन्या, पर्यटन व्यावसायिक अशा धनदांडग्याकडून अभयारण्याच्या नियंत्रण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याप्रकरणी वारंवार तक्रारी करून देखील कारवाई झालेली नाही. श्रमिक मुक्ती दल आता जनतेची कारवाई करण्यासाठी सज्ज झाले असून, शासनाकडून १५ दिवसात कारवाई न झाल्यास जनताच टिकाव-खोरी घेऊन कारवाई करेल असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी डॉ.प्रशांत पन्हाळकर व चैतन्य दळवी उपस्थितीत होते.

डॉ. भारत पाटणकर पुढे म्हणाले, अभयारण्याच्या क्षेत्रात भांडवलवाले व्यावसायिक, पवनचक्की कंपन्या, पर्यटन व्यावसायिक अशा धनदांडग्याकडून अभयारण्याच्या नियंत्रण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. कराड येथे व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत या विषयीचे पुरावे देऊन देखील आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. कोयना प्रकल्पग्रस्त व इतर शेतकरी यामुळे प्रचंड असंतोष पसरला आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या कृतीतून साधा नियम जरा मोडला तर शेतकऱ्यांना दंड किंवा शिक्षा ठोठावली जाते. मग या धेंडाना मोकाट का सोडले जाते असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे. याप्रकरणी श्रमिक मुक्ती दल आता जनतेची कारवाई करण्यासाठी सज्ज झाले असून, शासनाकडून १५ दिवसात कारवाई न झाल्यास जनताच टिकाव-खोरी घेऊन कारवाई करेल असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.

No comments