Header Ads

साताऱ्याचे नाव नृत्यामध्ये विदेशात झळकणार ; पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीचे विद्यार्थी बँकॉक दौऱ्यावर satara

सातारा : नृत्य ही साधना आहे, नृत्य ही एक कला आहे. त्या कलेचे शिक्षण देणारी सातारा शहरातील ‘पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी' १४ वर्षापासून कार्यरत आहे. या अॅकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी नृत्यामध्ये आपले नाव चमकवले असून ‘रियालिटी शो'मध्येही ते गाजले आहेत. याच अॅकॅडमीचे विद्यार्थी आता चक्क बँकॉक येथे होणा-या स्पर्धेसाठी चालले असून साता-याचे नाव नृत्यामध्ये विदेशात झळकणार आहे.

इंडियाज इंटरनॅशनल ग्रुह फिस्ट इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशीप यांच्यांतर्गत थायलंड येथे होणा-या इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशीपसाठी साताऱ्यातील पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीच्याज्युनिअर आणि सिनिअर ग्रुपची निवड झाली असून त्यांची तयारी सुरु आहे. १४ वर्षांपासून सातारा शहरात अॅकॅडमी नृत्याचे धडे देत आहे. रियालिटी शो, डान्स शो च्या माध्यमातून विद्यार्थी चमकले आहेत. सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेज डेअरींग, आत्मविश्वास वाढवणे, कलागुणांना वाव देणे आदी ठोस काम ही अॅकॅडमी करत आहे. आता साताऱ्यातून भारताबाहेर अॅकॅडमीतील विद्यार्थी जाणार असून पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी थायलंडला २ नोव्हेंबरला जाणार आहे. यामध्ये ज्युनिअर ग्रुपमधून सारा जाजू, स्वस्ति रजपूत, श्राविका भणगे, सानिका मोरे, श्रेया लखापती, स्नेहल लखापती, अनुष्का भोसले, गार्गी हंगेकर, श्रेया जाधव, तर सिनिअर ग्रुपमधून श्वेता वाघ, श्रावणी खांडके, श्रावणी मुळे, श्रेया भोसले, गायत्री पाटील, जहिर शेख, हर्षवर्धन, वेदांत शिंदे, आदित्यराज भोसले, निशांत रणदिवे यांचा सहभाग आहे. दोन दिवस हे विद्यार्थी बँकॉक येथे स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. त्यानंतर थायलंड भ्रमंती करणार आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पंकज चव्हाण, कोरिओग्राफर सुशील लोखंडे, किरण देवर यांनी केले. विद्यार्थ्यांना राजमाता कल्पनाराजे भोसले, खा.श्री.छ उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments