Header Ads

आमचं बरेच काही ठरलंय, त्याचे परिणाम दिसतायत आणि यापुढे ही दिसतील : आ.जयकुमार गोरे satara

सातारा : मी जिथे आहे, तिथे सुखी आहे. जे साध्य करायचे होते ते केले. ज्या ज्यावेळी ज्या गोष्टी व्हायच्या. त्या होवून जात असतात. आजपर्यंत अनेकांनी माझ्यापुढे अडचणी निर्माण केल्या. खोटे गुन्हे दाखल केले. मात्र, तरी जयकुमारला कोणी थांबवू शकले नाहीत. अशांचा कार्यक्रम होणार आहे. नीरा-देवघरच्या पाण्यासाठी जे 12 वर्षात जमले नाही ते 12 दिवसांमध्ये खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी करून दाखविले आहे, असे सांगत आ.गोरे यांनी आमचं बरेच काही ठरलंय, त्याचे परिणाम दिसतायत आणि यापुढे ही दिसतील, अशा शब्दात प्रतिक्रिया आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याच्या टॅंकर वाटप निमित्ताने खा.शरद पवार यांनी रोहित पवारांसाठी चाचपणी केल्यानंतर आ.जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या विरोधात लढायला मजा येईल, अशी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. उगाच चुटपुटची लढाई करण्यापेक्षा थेट पवारांच्या विरोधात लढण्यास सज्ज असल्याचे आ.गोरे यांनी सांगितले.

No comments