Header Ads

सातारा-जावली मतदारसंघातील ७ कामांसाठी १२ कोटी मंजूर ; सातारा तालुक्यातील ६ तर, जावलीतील १ कामाचा समावेश satara

सातारा : सातारा- जावली मतदारसंघात आ.श्री.छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून विकासकामांचा झंजावात सुरु असून नुकत्याच सुरु असलेल्या अधिवेशनात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील सहा विकासकामांसाठी तब्बल ९ कोटी ५८ लाख रुपये तर, जावली तालुक्यातील बहुचर्चीत कुडाळ ते पाचगणी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २ कोटी ५० लाख असा एकूण १२ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आहे.

अधिवेशन सुरु असून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात आ. शिवेंद्रराजे यांनी या सात विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करुन घेतली आहे. जावली तालुक्यातील कुडाळ ते पाचगणी या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी (०/२०० ते १७/००) अर्थसंकल्पात २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातारकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावर जाणा-या गोडोली (साईबाबा मंदीर चौक), रामराव पवार नगर, गोळीबार मैदान वसाहत, जगतापवाडी, शाहू चौक ते अजिंक्यतारा किल्ला (प्रजिमा ३०) या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ४८ लाख रुपये, याच रस्त्यावरील छोट्या पुलाजवळ संरक्षक भिंत बांधण्यासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. सातारा तालुक्यातील सातारा, कास ते बामणोली (प्रजिमा २६) या २०/०० ते २८/०० किमी रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी ३ कोटी ५० लाख, सातारा, गजवडी ते ठोसेघर, चाळकेवाडी रस्त्याचे (७/०० ते ११/५०० किमी.) मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ३० लाख, लिंबखिंड ते खिंडवाडी रस्ता प्र.जि.मा. ३० (१/२०० ते १/८०० व ३/०० ते ५/६०० किमी) या रस्त्याचे मजबुतीकरण आणि खडीकरण करण्यासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य मार्ग १४० ते सोनगांव, कुमठे, आसनगांव रस्ता प्र.जि.मा. ३१ (०/०० ते ०/६००, १/६०० ते १/८००, ३/६०० ते ५/४०० आणि ९/२०० ते ९/७५० किमी) या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. तातडीने शासकीय सोपस्कार पुर्ण करुन निवीदा प्रक्रिया राबवा. त्वरीत वर्क ऑर्डर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा आणि सर्व कामे दर्जेदार करा, अशा सक्त सुचना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांना केल्या आहेत.

No comments