Header Ads

अन्न व औषध प्रशासनाकडून महाबळेश्वर व पाचगणी येथील हॉटेलची तपासणी satara

सातारा : अन्न व औषध प्रशासनाकडून आज विशेष मोहिम राबवून महाबळेश्वर व पाचगणी येथील हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांनी दिली आहे. आजच्या तपासणीमध्ये मे. लाईव्ह ओक रिसॉर्ट, पाचगणी, मे. ला फोरचुना रिसॉर्ट, मेटगुटात ता. महाबळेश्वर  व मे. बगीचा कॉर्नर, लिंगमळा महाबळेश्वर या हॉटेलची तपासणी करण्यात आली असून त्रुटी आढळल्याचे दिसून आले आहे. या आस्थापनेविरुद्ध अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचेही श्री. कोडगिरे यांनी कळविले आहे.

No comments