Header Ads

लवकरच नगरपरिषदेची सुसज्य अशी प्रशासकीय इमारत सदरबझार येथे नियोजित जागेत उभी राहील : खा.उदयनराजे satara

सातारा : ज्या जागेवर सातारा नगरपरिषदेची सुसज्य प्रशासकीय इमारत उभी करण्याची आहे ती जागा नगरपरिषदेने नाममात्र एक रुपया देवून खुशखरेदी केलेली आहे. सदर जागेवरील टाउन हॉलचे आरक्षणाऐवजी नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत असा आरक्षण बदल करण्याच्या नगरपरिषदेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयास, राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. धोरणात्मक निर्णयाच्या वेळी श्रेयवादाकरीता ज्यांनी आरक्षणात बदल होणार नाही, असे कसे होईल अशी कोल्हेकुई उठवली होती, त्यांना ही फार मोठी चपराक आहे. लवकरच नागरीक व कर्मचारी यांच्या सुविधेकरता, नगरपरिषदेची सुसज्य अशी प्रशासकीय इमारत सदरबझार येथे नियोजित जागेत उभी केली जाईल हा आमचा जनतेला दिलेला शब्द आणि विश्वास आहे अशी माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यानी दिली आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, नगरपरिषदेची सुसज्य प्रशासकीय इमारत झाली तर, खासदार उदयनराजेंना श्रेय जाईल अशी भिती ज्यांना वाटते,अश्या संकुचित विचारी व्यक्तींनी नगरपरिषदेने प्रशासकीय इमारती बाबत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्यावेळी आकांतांडव करताना, असे होउ शकत नाही, आरक्षण वगळले जाणार नाही, एक रुपयांत जागा कशी घेतली, असं कुठ असतं का? असे रडीचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांचा विरोधाचा हेतु शुध्द नव्हता. प्रशासकीय इमारत झाली तर खासदारांना म्हणजेच आम्हाला श्रेय जाईल मग आपलं कसं होईल अशी अनामिक परंतु रास्त भिती त्यांच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्यांची कोल्हेकुई सुरु होती. तथापि आम्ही कधीही श्रेय मिळेल म्हणून विकास कामे केलेली नाहीत. आम्हाला लोकांची सोय महत्वाची आहे. आज प्रशासकीय इमारतीची असलेले टाउन हॉलचे आरक्षण वगळण्यात आले असून, त्याऐवजी नगरपरिषद प्रशासकीय इमारत असा आरक्षण बदल करण्यास मान्यता राज्यशासनाने दिली आहे. प्रशासकीय इमारतीच विरोध करणा-यांना ही जबरदस्त चपराक बसली आहे. याच कामाच नव्हे तर आमच्या सर्व कामाच पाहीजे असेल तर तुम्ही श्रेय घ्या पण संकुचित आणि कुपमंडूक वृती यापुढे तरी जाहिर करु नका.

झाकली मुठ सव्वालाखाचीच ठेवा अश्या शब्दात फटकारताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे म्हटले आहे की, १९७७ पासूनचे रखडलेले कास बंदिस्त पाईप लाईनचे काम आम्ही सन १९९३ च्या आम्ही सुरु करून, पूर्णत्वास नेले, परंतु ते म्हणतात आम्हीच केले. आमचेचे श्रेय आहे. कास धरणाची उंची वाढवण्याचे काम आम्ही पुढाकार घेवून मार्गी लावले परंतु त्यांनी मात्र तत्कालीन वित्त मंत्री यांनी निधीची तरतूद केली म्हणून श्रेय त्यांचे आहे अशी श्रेयवादाची खोटी असलेली आवई उठवली. ग्रेड सेपरेटरची संकल्पना आम्ही मांडली,त्यावेळी त्यांची चेष्टेचा विषय केला, आज ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता हेच लोक ग्रेडसेपरेटरचा निधी सरकारने दिला अशी श्रेयवादाची कोल्हेकुई करायला लागले. भुयारी गटर योजनेच्या बाबतीतही त्यांची हिच श्रेयवादाची आडमुठी भुमिका होती. याउलट आम्ही प्रस्तावित केलेल्या, पाठपुरावा केलेल्या विविध कामांचे श्रेय आम्ही सर्वसामान्य जनता आणि आमच्या असंख्य कार्यकत्यांना ज्या त्यावेळी देत आलो आहोत हे सर्वाना ज्ञात आहे. म्हणूनच पाहीजे तर आमच्यासह अन्य व्यक्तींनीही केलेल्या विविध सार्वजनिक विकास कामांचे श्रेय सुध्दा तुम्ही घ्या परंतु तुमच्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करुन, स्वतःची छीथू करुन घेवू नका असा मार्मिक टोला देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लगावला. 

No comments