Header Ads

चंद्रकांत वानखेडे यांचे सोमवारी साताऱ्यात व्याख्यान satara

सातारा : हे वर्ष महात्मा गांधीजींचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यासाठी आजच्या संदर्भात गांधीजीचा विचार लोकांसमोर मांडला पाहिजे. म्हणून महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्षात वर्षभर विविध क्षेत्रातील गांधी विचारांचा जागर करणारी व्याख्यानांचे आयोजन करण्याचे सातारा शहर काँग्रेस कमिटीने ठरवले आहे. यामध्ये या वर्षभरात प्रत्येक महिन्यात एक याप्रमाणे  गांधीजींचा विचार आजच्या संदर्भात मांडणारे तसेच गांधीजींच्या विषयी समज- गैरसमज दूर करणारे व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. अशी माहिती सातारा शहर काँग्रेस चे अध्यक्ष माजी सभापती डॉ. रवींद्र भारती- झुटिंग यांनी सांगितले. या व्याख्यानमालेतील आठवे पुष्प, ज्येष्ठ शेतकरी नेते, लेखक विचारवंत व पत्रकार चंद्रकांत वानखेडे ( नागपूर ) हे "महात्मा गांधी मरत कसे नाहीत?" या विषयावर' गुंफणार आहेत.

हा कार्यक्रम मुक्तांगण, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालया शेजारी गुरुवार पेठ, सातारा. येथे सोमवार दि. २४ जून  रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या वर्षभर चालणाऱ्या व्याख्यानमालेत आतापर्यंत जेष्ठ पत्रकार संजय आवटे, अँड राज कुलकर्णी, डॉ रत्नाकर महाजन, संकेत मुनोत, जयंत दिवाण, रामदास भटकळ, प्रसाद कुलकर्णी आदींची व्याख्याने झाली आहेत. सातारा शहरातील युवक, विदयार्थी व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. 

No comments