Header Ads

शिवेंद्रराजे आमचे बंधु असले तरी जैसी करनी वैसी भरणी या न्यायातुन कोणालाच सुट मिळत नाही ; शंका-संशय घेणे ही शिवेंद्रराजेंची कुजकी सवय : खा.उदयनराजे satara

सातारा : जैसी करनी वैसी भरणी या न्यायातुन कोणालाच सुट मिळत नाही, आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधु असले तरी सुध्दा याला ते अपवाद नाहीत, लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केले असल्याने, आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावली विधानसभा मतदार संघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. तथापि त्यांच्या करणी मुळे जर काही बरे-वाईट घडले तर त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील. रोग रेडयाला आणि इलाज पखालीला असला त्यांचा सुरु असलेला प्रकार त्यांनी बंद करावा. स्वतःच निर्माण केलेल्या बागुलबुवांना स्वतःच निपटावे, आमच्यावर तर नाहीच नाही परंतु दुस-या कोणावरही अगोदरच (प्री-मॅच्युरिटी) खापर फोडू नये असे तडाखेबंद प्रत्युत्तर आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिले आहे.

आमदार शिवेंद्रराजे सध्या भलतेच सावध झाल्याचे त्यांच्या विधानांवरुन दिसत आहे. त्यांना सर्वत्र दगाबाजी, दगाफटका-धोका यांचेच चित्रण डोळयासमोर येत आहे असा दाट संशय त्यांच्या एकंदरीत विधानावरुन येत आहे असे नमुद करुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या आधीची तुमची वक्तव्ये एकदा तपासून पहा. पवारसाहेबांनी आमदारांना विश्वासात घ्यावे, पवारसाहेब देतील तो उमेदवार मान्य असेल, पवारसाहेबांनी तिकीट दिले तरी उदयनराजेंचे काम करणार नाही, लोकसभेला उदयनराजेंच कामच करणार, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत वगैरे तुमचे उद्गार तुम्ही विसरलेला नसणार, किंवा तुम्ही मिशीवाल्यासोबत खाल्लेल्या चविष्ट मिसळीचा काही दिवसानंतर आता तुम्हाला ठसका लागत असावा. म्हणूनच कदाचित आता आमच्या प्रत्येक हालचालीविषयी तुम्हाला शंका उत्पन्न होत असावी. शंका-संशय घेणे ही तुमची कुजकी सवय आहे किंबहुना तो तुम्हाला वारसा लाभला आहे. तथापि काहीही असले तरी आम्ही दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत, तुमच्या विधानसभेला आमच्यापासून तरी काडीचाही धोका होणार नाही. उगाच साप समजुन भुई थोपटण्याचा प्रकार टाळला पाहीजे. परंतु त्याचबरोबर, जावलीत तुम्हीच उभी केलेली भुतं तुमच्या मानगुटीवर बसायला कमी करणार नाहीत याची नोंद गांभिर्याने घ्या. तुमचा निशाणा, तुमच्याच करणीने निर्माण केलेल्या बागुलबुवांवर ठेवा, रोग रेड्डयाला झाला आहे आणि तुम्ही इलाज पखालीला करत आहात. तुम्ही जे केले आहे तेच तुम्हाला दसपटीने परत मिळणार आहे याची खुणगाठ पक्की बांधुन, त्यादृष्टीने वाटचाल करा. आपण सातारा जावली विधानसभा मतदार संघातुन मनोमिलनानंतर महाराष्ट्रातुन दोन नंबरने निवडुन आला होता. एक नंबरला अशोक चव्हाण आणि तीन नंबरला अजित पवार हे होते. इतके लिड स्व.भाउसाहेब महाराजांपासून, कोणालाही मिळालेले नाही हे विसरलात का ? तसेच तुमचा आणि भगीरथ उर्फ भोगीरथाचा दुरवर कसला संबंध आहे का नाही हे सर्वांना माहीती आहे, उगाच विश्वामित्री पवित्रा घेवू नका. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जाहिर सभेत आपणासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी चांगले सहकार्य केले आहे असे जाहिरपणे नमुद कले आहे. काही दिवसांनी कथित भगिरथ उर्फ भोगीरथ मात्र उदयनराजेना जावलीत कमी मते मिळाली ते पहा असा अगांतुक सल्ला देतो. आपण तर म्हणता की सातारा जावली मध्ये मिळालेले मताधिक्य तुम्ही पक्षाशी प्रामाणिक राहून काम केल्याने मिळाले आहे. यावरुन तुमच्या बाबतीत संभ्रम कोण निर्माण करते आहे हे एकदा शांतपणे विचार करुन ठरवा.  जैसी करणी वैसी भरणी हा न्याय सर्वांनाच लागू आहे असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

No comments