Header Ads

ल्हासुर्णेत मागासवर्गीयांच्या जागेवर महावितरणचे अतिक्रमण satara

कोरेगाव : महावितरण कंपनीने ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये असलेल्या त्यांचे वडिलोपार्जित जागेमध्ये जबरदस्तीने विजचे खांब उभे केले करून अतिक्रमण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मागासवर्गीय लोकांनी कंपनीकडे विचारणा केली असता गावच्या विकासासाठी या ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविण्यात येत असून यासाठी हे खांब उभे केल्याचा खुलासा केला. परंतु विकासाच्या नवाखाली आमच्यावर महावितरण अन्याय करत असल्याचे मत मागासवर्गीय नागरिकांनी व्यक्त केले.

याबाबत महावितरण कंपनीकडे दिलेल्या निवेदनात महटले आहे, आम्ही सर्व बौद्ध समाजाचे ग्रामस्थ ल्हासुर्णे गावचे रहिवासी आहोत.आमची गट क्र.२५४ मध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये ल्हासुर्णे गावाच्या विकासाच्या नावाखाली आमच्या जागेमध्ये ट्रान्सफार्मर बसविण्याच्या नावाखाली विजेचे खांब उभे केले आहेत या विरुद्ध आम्ही तक्रार करूनही आपल्या कंपनीने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. महावितरणचे श्री. महामुनी हे पाहणी करून गेले आहेत परंतु अद्याप त्यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. ल्हासुर्णे गावची पाणीपुरवठा विहीर, डेपो आमच्याच जागेत असून गावच्या विकासाच्या नावाखाली आमचा महावितरण बळी घेत आहे असा आमचा आरोप आहे. सदर जमीन ४० जणांच्या नावावर असून उद्या वाटप करायचे झाल्यास या जागेचे कसे करावे याचा मार्गही महावितरणने सुचवावा अशी आमची मागणी आहे. निवेदनावर भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांच्यासहित अनेकांच्या सह्या आहेत.

अन्याय करून  विकास होत नाही : रमेश उबाळे

ल्हासुर्णे गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी आमचाही प्रयत्न सुरू आहे परंतु कोणत्याही समाजघटकांवर अन्याय करून गावाचा विकास होत नसतो आज ल्हासुर्णे  गावातील सर्व जाती धर्मातील लोक  बंधू भाव जोपासत एकत्र  गोळ्या- मेळ्याने राहतात परंतु विकासाच्या नावाखाली महावितरण कंपनी समाजामध्ये  तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत  आहे.असा आरोप रमेश उबाळे यांनी केला आहे.

No comments