Header Ads

हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब तपासणी व इतर मागण्यांसाठी आरपीआयच्या उपोषणाला वाढता पाठिंबा satara

सातारा : सध्या पावसाळा सुरु झाला असून आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे भविष्यात भरपूर प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध व्हाव्यात ही अपेक्षा आहे. यासाठी सरकारी धोरण अवलंबले की नाही ? यासाठी हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब तपासणी करावी व चळवळीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी सातारा आरपीआय ब्लू फोर्सने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. याला वाढता पाठिंबा मिळू लागला आहे.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गेल्या पाच वर्षात खाजगी हॉस्पिटल्स व पॅथॉलॉजी लॅब उभारणी झालेली आहे. उच्च पदवी घेवून आपल्या मायभूमीतील रुग्णांची आपल्या हातून सेवा घडावी यासाठी अनेक भूमिपूत्र डॉक्टर प्रामाणिकपणाने हॉस्पिटल व पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून सेवा घडवित आहेत. म्हणून सामान्य रुग्णांना रुग्णसेवेचा अनुभव येत आहे. दुर्दैवाने अशा डॉक्टरांची संख्या अत्यल्प आहे. याउलट, काहींनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या क्षेत्राचा बाजार मांडला आहे. हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅव व औषध कंपन्या यांची साता-यात महाआघाडी झाली असून यातून रुग्णांची अवस्था उसाच्या चिपाडासारखी केली जात आहे. कमिशन एजंटच्या माध्यमातून या क्षेत्रात आता रुग्णवाहिकाही आपले हात धुवून घेत आहेत. रुग्णाचा आजार बरा होणे, हे उद्दिष्ट असल्यामुळे आपणाला हॉस्पिटलमध्ये किती वेळ ठेवले, कोणते औषध दिले, कोणत्या चाचण्या करण्यात आल्या? याची अज्ञानी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली जात नाही, खरेतर हे कायद्याने बंधनकारक असतानासुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही. याचाच गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब तपासणी नियमितपणे केली जावी, ही प्रमुख मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आरपीआय व्लू फोर्स नेहमीच आंदोलन करीत असते. महागाई, आरक्षण, महिला संरक्षण, शैक्षणिक सवलती व शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिका-यांना इशारा देणे यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने केली जातात. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असताना जिल्हा प्रशासन व पोलीस दलाच्यावतीने कार्यकत्यांवर गुन्हे दाखल केले जातात. हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. परंतू काही अधिका-यांना इच्छुक ठिकाणी बदली झाली नसल्याने शासनाच्या आदेशाची ते अंमलबजावणी करीत नाहीत. यामुळे कार्यकत्यांचे खूप मोठे नुकसान होते. तसेच न्यायालयाचा वेळही वाया जातो. तरी हे गुन्हे मागे घेण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष दादासाहेव ओव्हाळ, जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, पक्ष प्रमुख वावा ओव्हाळ, रमेश सवतमाल, सचिन जाधव, ज्ञानेश्वर ओव्हाळ, राजू शिदे, नितीन चव्हाण, सचिन सर्वदे, सिद्धार्थ समिंदर, सुनिल ओव्हाळ, बंटी गायकवाड, किरण ओव्हाळ सहभागी झालेले आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, खेड राष्ट्रवादीचे पॅनलाध्यक्ष सुजित पवार, पिंटू गायकवाड, अजित जगताप यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

No comments