Header Ads

औद्योगिक क्षेत्रातील भूखंड विकसीत करण्यासाठी विशेष मुदतवाढ योजना : एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण satara

सातारा : महामंडळाने विकसीत केलेल्या औद्योगिक क्षेत्रात भूखंडधारकांना त्यांनी महामंडळासोबत केलेल्या करारनाम्याप्रमाणे देय असलेल्या विहीत विकास कालावधीमध्ये बांधकाम नकाशे मंजूर करून घेवून त्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करून उत्पादन सुरू करणे अपेक्षित असते. तथापि काही कारणांमुळे विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करून इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यासाठी भूखंडधारकांना इमारत पुर्णत्वाचा दाखला प्राप्त करता येत नाही, त्यासाठी मुदतवाढीची आवश्यकता असते. याकरीता महामंडळाने यापूर्वी ६ मार्च २०१३ रोजी विशेष मुदतवाढ योजना आणली होती. त्यानुसार इमारत पूर्णत्व दाखला प्राप्त करून उत्पादनात जाणेकरीता पहिली व दुसरी मुदतवाढ देणेत आली होती. त्यानंतर भूखंडधारकाने भूखंडाचा विकास करणेकामी केलेल्या परिणामकारक कार्यवाहीची व बांधकाम  प्रगती विचारात घेवून तिसरी व चौथी मुदतवाढ परिपत्रकानुसार अनुज्ञेय करणेत आली होती. दरम्यानच्या कालावधीत दि.२३ऑक्टोबर २०१५, १४ मार्च २०१६ व ६ सप्टेंबर २०१६ च्या परिपत्रकानुसार भूखंडधारकांना उद्योग संजीवनी योजना लागू करणेत आली होती.

महामंडळाद्वारे वेळोवेळी मुदतवाढीसाठी परिपत्रके काढून भूखंडधारकांना भूखंड विकासासाठी सूट देण्यात आल्यानंतर सुध्दा भूखंडधारकांद्वारे भूखंडाचा विकास करण्यात येत नाही.  तसेच भूखंड वाटपाच्या वेळेसच भूखंडधारकास जमीन घेवून ठेवण्याच्या प्रवृत्तीस आळा बसेल या दृष्टीने महामंडळाने कार्यवाही करावी, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा होवून ठराव क्र.५८३७ पारीत करण्यात आला. या ठरावाच्या अनुषंगाने  भूखंड विकसीत करण्यासाठी दि.३१ऑगस्ट २०१९ पर्यंत विशेष मुदतवाढ योजना क्र.२ लागू करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेवून नकाशे मंजूर अथवा नकाशे मंजूर न करता बांधकाम पूर्ण केलेले आहे व भूखंडधारक उत्पादनात गेलेला आहे किंवा उत्पादनात जावून सद्यस्थितीत उत्पादन बंद आहे, अशा औद्योगिक ,व्यापारी, निवासी तसेच प्राधान्याकरीता  उद्योग विस्तारासाठी वाटप केलेल्या सर्व प्रकारच्या भूखंडांसाठी कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील ज्या भूखंडधारकांना इमारत पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यासाठी मुदतवाढीची आवश्यकता आहे,  त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रादेशिक कार्यालय, मऔवि महामंडळ, उद्योग भवन, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे संपर्क करावा,असे आवाहन करणेत येत आहे.  सदरहू योजना दि.३१ ऑगस्ट पर्यंतच लागू आहे, याची उद्योजकांनी नोंद घ्यावी अशी माहिती एमआयडीसीचे  प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कळविली आहे.

No comments