Header Ads

व्याघ्र प्रकल्पाच्या प्रश्नांवर गेल्या पाच वर्षात संसदपट्टूनी साधे तोंड उघडले नाही ; न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आ.देसाईंना अधिकार नाही : मा.मंत्री विक्रमसिंह पाटणकर patan

पाटण : व्याघ्र प्रकल्पाच्या प्रश्नांवर गेल्या पाच वर्षात संसदपट्टूनी साधे तोंड उघडले नाही. त्याची बातमी कुठे वाचायला मिळाली नाही. १४ गावे वगळण्यासाठी आम्ही जनतेला घेऊन १२ वर्षे संघर्ष केला. सुप्रिम कोर्ट, हायकोर्टात न्यायालयीन लढा दिला. राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील १४ गावे वगळण्याची कार्यवाही केली. हे समजताच आमदार देसाईंनी फुकटचे श्रेय घेण्यासाठी तालुक्यात येऊन बातम्या दिल्या. मात्र त्यांच्या अगोदर आमच्या हातात जीआर मिळाला होता. त्याचा त्यांना पत्ताच नव्हता. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा आ.देसाईंना काहीच अधिकार नाही असा टोला माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी यावेळी लगावला. कोयनानगर येथे मानवी हक्क संरक्षण समिती व व्याघ्र प्रकल्पातील वगळलेल्या १४ गावांतील जनतेच्या वतीने रविवार दि. ९ रोजी सत्कार समारंभ व आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, मानवी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष, उपसभापती राजाभाऊ शेलार, सभापती उज्वला जाधव, अंधेरी काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव देसाई, दुध संघाचे चेअरमन शंकरराव जाधव, खविसचे चेअरमन अॅड.अविनाश जानुगडे, माजी सभापती नानासाहेब गुरव, काँग्रेसचे नरेश देसाई, जि.प.सदस्य बापूराव जाधव, पंचायत समिती सदस्य, बबन कांबळे, प्रताप देसाई, उज्वला लोहार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे, पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सुषमा महाजन, महिला काँग्रेसच्या स्नेहल जाधव, शोभा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विक्रमसिंह पाटणकर पुढे म्हणाले, न केलेल्या कामाचे श्रेय घेणे आमदार देसाईंची जुनी सवय आहे. आघाडी शासनाच्या काळात व्याघ्रप्रकल्पातील १४ गावे वगळण्याबाबत निर्णय झाला होता. मानवी हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून १४ गावातील  जनतेला घेऊन मोर्चे आंदोलने केली. केंद्र सरकार सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई लढली. त्यामुळे आघाडी शासनाच्या काळातच १४ गावे वगळण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही तांत्रिक व न्यायालयीन अडचणीमुळे पुढे अंमलबजावणीस विलंब लागला. स्वतःला संसदपटू म्हणून मिरवणारे आमदार देसाई यांनी त्याला विरोध केला. कधीही याबाबत विधानसभेत बोलले नाहीत. त्या गावातील लोकांचे आयुष्य त्यांना उद्ध्वस्त करायचे होते. आजपर्यंत त्यांनी नवीन प्रकल्प उभारणीला विरोधच केला. कोयना धरणातील बोटिंग व्यवसाय बंद करून त्यांनी यावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त केले. त्यामुळे कोयनेच्या बाजारपेठेवर गंभीर परिणाम झाला. येथील पर्यटन ठप्प झाले. पाच वर्षात जनतेचे झालेले नुकसान संसदपटू भरून देणार आहेत का ?, ह्यामुळे तालुक्याची अधोगती होईल का प्रगती हे जनतेला लोक प्रतिनिधी निवडताना कळायला पाहिजे होते. अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा सत्तेवर येऊ देऊ नये हे जनतेने ठरवावे नाहीतर तालुक्यात जे काही शिल्लक आहे त्याचाही विद्वांस होईल विरोधकांनी आज पर्यंत  गावागावात भांडणे लावायचे काम केले. अशा प्रवृत्तींना लोकांनी कडाडून विरोध केला पाहिजे. हा लढा अजून थांबला नाही. अजून बऱ्याच लोकांच्या जमिनी कोअर झोनमध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यात १४ गावे वगळण्याचा  आदेश दिले होते. मात्र आमदार देसाईंनी हे काम जाणून-बुजून आडवून ठेवले होते. आम्ही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वेळोवेळी प्रयत्न व पाठपुरावा केला. त्यामध्ये त्यांचे सहकार्य मिळाले. रस्त्यांना पवनचक्क्यांना विरोध करणारे पवनचक्क्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून रस्त्यांचे भूमिपूजन करायला  पुढे आहेत. आजपर्यंत भांडणे लावायची उद्योग यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना व कै.पतंगराव कदम वन मंत्री असताना हा निर्णय जाहीर केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आ.शशिकांत शिंदे, आ.आनंदराव पाटील यांचे सहकार्य याकामी मिळाले. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानेच हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे शेवटी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नरेश देसाई, नानासाहेब गुरव, बबन कांबळे, अशोकराव देसाई, धोंडीराम ताटे, राजेश शिंदे, शोभा कदम, स्नेहल जाधव यांनी तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले. यावेळी ह्या लढ्याचे जनक माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ शेलार यांचा १४ गावच्या जनतेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास सुभाषराव पवार, नथुराम मोरे, नगरसेवक सचिन कुंभार, अजय गवडे, किरण पवार, बापू देवळेकर, दाजी पाटील, पूजा कदम, भीमराव शिंदे, अनुप मोहिते, अंकुश पाटील, बाजीराव देसाई, सत्यजित शेलार, परशुराम शिर्के, गणपत यादव, संतोष विचारे, भागुजी लांबोर यांच्यासह १४ गावातील डोंगर पठारावरील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.

No comments