Header Ads

बोथे प्रकरणात शेखरभाऊ गोरे यांची निर्दोष मुक्तता ; शेखरभाऊ गोरे समर्थकांकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा man

बिजवडी : बोथे ता. माण येथील बोथे विंड मिल या पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी जबरदस्ती करुन धमकावणे व शिवीगाळ करुन जमीनीतुन रस्ता काढल्या प्रकरणी दहिवडी न्यायालयाने  शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांना १६ ऑक्टोंबर २०१८ रोजी ३ वर्षे शिक्षा व ११ हजार ५०० रुपये दंड दहिवडी न्यायालयाने ठोठावला होता. या शिक्षेविरोधात शेखरभाऊ गोरे यांनी अति.जिल्हा सत्र न्यायालय वडूज यांच्याकडे अपील केले होते.या अपीलात न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखरभाऊ गोरे यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, बोथे पवनचक्की प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामावेळी फिर्यादी घाडगे यांनी त्यांचा रस्त्याशी काही संबंध नसताना राजकीय द्वेषापोटी विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने माझ्यावर दहिवडी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात सबळ पुरावे देऊनही दहिवडी न्यायालयाने माझ्याविरोधात शिक्षेचा निकाल दिला होता. तरीही माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याने मी वडूज अति.जिल्हा सत्र न्यायालयाकडे अपील केले होते. वडूजच्या न्यायालयात न्यायदेवेतेने मला न्याय दिला असून माण खटावच्या जनतेच्या आशीर्वादाची साथ लाभत मला या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली असल्याचे शेखरभाऊ गोरे यांनी सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी , माण खटाव तालुक्यातील युवा नेते शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांवर बोथे येथील पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी कस्तुरा घाडगे यांच्या जमीनीतुन जबरदस्तीने दमदाटी व शिवीगाळ करुन रस्ता केल्या प्रकरणी दहिवडी पोलीस स्टेशनला दि.९ फेब्रुवारी २०१३ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. दहिवडी पोलीस स्टेशनकडून सदर घटनेचा तपास करून दहिवडी कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.यात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर दहिवडी न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर. मोहने यांनी शेखरभाऊ गोरे व अन्य दोघांना दि.१६ ऑक्टोंबर २०१८ रोजी ३ वर्ष शिक्षा व ११हजार ५०० रुपये दंड केला होता. त्यावेळी शेखरभाऊ गोरे यांनी या शिक्षेविरोधात जाण्याचा निर्णय घेत अपील करण्यासाठी जामीन मंजुर व्हावा अशी मागणी केली होती.त्यावेळी त्यांना दहिवडी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर शेखरभाऊ गोरे यांचेवतीने या शिक्षेच्या विरोधात वडुज अति.जिल्हा सत्र न्यायालयात दिनांक २९ ऑक्टोंबर २०१८ रोजी अपील दाखल केले होते.या अपीलात शेखरभाऊ गोरे यांच्यावतीने अँड.एन.एम.गोडसे व एन.टी.शिंगाडे यांनी सबळ पुराव्याद्वारे युक्तीवाद मांडला होता.हा युक्तीवाद ग्राह्य धरत त्याची सुनावणी होऊन आज दिनांक १८ जून २०१९ रोजी वडुज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी शेखरभाऊ गोरे यांच्यासह दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. शेखरभाऊ गोरे यांची बोथे प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याचे वृत्त माण खटाव तालुक्यात समजताच शेखरभाऊ गोरे प्रेमी कार्यकर्ते व जनतेकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

No comments