Header Ads

सुभेदार मेजर आण्णासाहेब माने यांचे अपघाती निधन ; देशसेवेबरोबरच अवयव दान करुन समाजापुढे ठेवला आदर्श man

म्हसवड : येथील रहिवाशी व टेरीटोरीयल आर्मी महाराष्ट्र १०९ मध्ये सुभेदार पदावर कार्यरत असलेले आण्णासाहेब बचाराम माने वय ४० वर्षे यांचे पुणे येथील कमांड हाॅस्पिटल मध्ये निधन झाले. मृत्यूनंतर नातेवाईकांनी महाराष्ट्र बटालियन च्या अधिका-यांच्या मदतीने किडनी व लिव्हर केला गरजवंताला दान करण्यात आले. आण्णासाहेब माने २२ वर्षापूर्वी टेरीटोरीयल आर्मी महाराष्ट्र १०९ या बटालियन मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रा बरोबरच पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, जम्मू काश्मीर येथे आपली सेवा बजावली होती. सेवेत असताना आपल्या कबड्डी खेळात चांगलीच चुणूक दाखवली होती सुरुवातीस खेळाडू त्यानंतर संघाचा कर्णधारांना व मुख्यप्रशिक्षक अशा भुमिका पार पाडत त्यांनी आपल्या बटालियनला अनेक विजेतीपदे मिळवून दिली होती.

दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड मध्ये आपल्या बटालियनचे नेतृत्व त्यांनी केले होते. वरकुटे-म्हसवड गावाला कबड्डीची मोठी परंपरा आहे. गावात खेळाडू ते मार्गदर्शक अशा भुमिका पार पाडत कबड्डीचा प्रचार व प्रसार करण्यात मोलाची भुमिका बजावली होती. गावातील सांस्कृतिक व सामाजिक कामात ते नेहमीच आघाडीवर असत. गावातील अनेक तरूणनांना त्यांनी सैन्य भरती संदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा वरकुटे-म्हसवड, माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल म्हसवड भागशाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथे झाले होते. त्यांना ३ फेब्रुवारी रोजी सुभेदार मेजर पदावर बढती मिळाल्यानंतर ग्रामस्तांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर ते पहिल्यांदाच घरी आले होते. गेल्या आठवड्यात गाडीवरून घरी परत येत असताना गाडीवरुन पडुन जखमी झाले त्या अवस्थेत त्यांना प्रथम म्हसवड येथे व त्यानंतर पुणे येथील कमांड हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते,पण उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच गावात शोककळा पसरली, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचेवर सोमवारी सकाळी वरकुटे-म्हसवड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments