Header Ads

रायगडावर ३४६ व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना maha

रायगड : आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा शिवराज्याभिषेक दिन पार पडला. या कार्यक्रमासाठी संपूर्ण रायगड किल्ला सजवण्यात आला होता. ढोल-ताशे, लेझीम आणि पोवाड्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी मानवंदना देण्यात आली. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. तर सकाळी साडेनऊ वाजता महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) उपस्थित होते. १० वाजून १० मिनीटांनी मेघडंबरीत महाराजांना सुवर्ण नाण्याचा अभिषेक करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. सकाळपासूनच रायगडावर विविध कार्यक्रम सुरु होते.सकाळी शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, दांडपट्टा, भाला, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले. दरम्यान शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली.

No comments