Header Ads

मी खुप एकटा पडलोय, ग्रामीण भागातून आलोय म्हणून माझ्यावर हा अन्याय होत असल्याची बिचुकालेंची भावना maha

सातारा : निवडणुक कोणत्याही प्रकारची असो. अभिजीत बिचुकले (एबी) हे नाव त्यात असणारच असे समीकरण गेल्या काही वर्षांत झाली आहे. पालिका ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत साताऱ्याचा हा बहादर आपले असतित्व दाखवितो, आणि लोकांच्या चर्चेचा विषय ठरतो. निवडणुकांमध्ये अल्प पाठींबा देणारी जनता "एबी' तूच बिग बॉस ठरणार, लढ भावा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा पाठींबा सोशल मिडियातून त्यांना व्यक्त करु लागली आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. स्पर्धकांमध्ये साताऱ्यातील अभिजीत बिचुकले हे आहेत. त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी आहे. ते कवी मनाचे आहेत. राजकारणात सक्रिय आहेत. साताऱ्यातील कोणत्या ही चौकात ते उभे राहून आपली मते ठामपणे युवकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रपतीपदाची निवडणुकही लढविण्याची इच्छा त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली होती. असे हे साताऱ्याचे बिचुकले सध्या बिग बॉस मराठीत आपली चुणुक दाखवित आहेत. विशेष म्हणजे मालिका सुरु झाल्यापासून बिचुकले चर्चेत आहेत. स्पर्धकांच्या एका ग्रुपचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. बिचुकलेंची व्यक्तव्य अन्य स्पर्धकांना बोचू लागली आहेत. बिग बॉसच्या घरातील सदस्यांशी त्यांचे खटके उडू लागले आहेत. त्यांच्याशी कोणी ही जुळवून घेत नसल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करुन व्यक्त केले आहे. माझ्या आडनावावरून चिडवल गेलं तरीही सगळे गप्प बसले. माझं मत बिग बॉसच्या घरात कोणीच ऐकून घेत नाही. मी खुप एकटा पडलोय. मी ग्रामीण भागातून आलोय म्हणून माझ्यावर हा अन्याय होतोय अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये #StayStrongBichukale हा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे. त्यांच्या ट्विटला रसिकांनी प्रतिसाद देत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे पाठबळ दिले आहे.

No comments