Header Ads

पंढरपुरात राम कदमांना साडीचोळी बांगड्याचा आहेर maha

पंढरपूर : अलीकडेच गुजरातमधील भाजप आमदाराने महिलेला मारहाण करून शिवीगाळ केल्याबद्दल व महिलांचा अवमान केल्याबद्दल भाजप आमदार राम कदम यांना आज (ता.06) पंढरपुरातील महिला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या रोषाला सामाेरे जावे लागेले. भाजप आमदार महिलांचा अवमान करत असल्याच्या निषेधार्थ आज(ता. 06) येथील महिला राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी आ. राम कदम यांना आज साडी चोळी बांगड्याचा आहेर देऊन निषेध केला. यावेळी आमदार राम कदम भाजप सरकार हाय..हाय अशा घोषणा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज पंढरपुरात बैठक होती. त्यानिमीत्त बैठकीसाठी आ. राम कदम आज पंढपुरात आले असता भक्त निवासात हा प्रकार घडला.

No comments