Header Ads

पुसेसावळीत जबरी चोरी ; लाकडी दांडक्याने मारहाण व चाकुचा धाक दाखवुन सव्वालाखाचा ऐवज लंपास khatav

पुसेसावळी : पुसेसावळी ता.खटाव  येथे नवीन एस.टी स्टॅण्ड समोर गिरिजा शंकर खानावlळीच्या पाठीमागे राहणार्‍या एका दाम्पत्याच्या घरावर पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील ८० हजार रुपये रोख व दीड तोळे सोन्याचा ऐवज पळविल्याची धक्‍कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. शिवाजी माने व शारदा माने असे दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या दाम्पत्याचे  नाव आहे. या घटनेने पुसेसावळी परिसरात एकच खळबळ उडाली असुन पुसेसावळी पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पुसेसावळी नवीन एसटी स्टॅण्ड समोर श्री गिरिजाशंकर खानावळ हे शिवाजी माने यांचे हाॅटेल असुन ते आपली पत्नी शारदा माने यांच्यासमवेत खानावळ चालवतात व हाॅटेल च्या पाठीमागे असणार्या दोन खोल्यामध्ये राहतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे हाॅटेल बंद करून झोपले असता शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास दरवाजा कटावुन दारास धक्का मारुन पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करुन शिवाजी माने व शारदा माने या पती पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करुन व चाकुचा धाक दाखवुन  दरोडेखोरांनी कपाटातील ऐंशी हजार रुपये रोख,सोन्याची कर्णफुले,गरसोळी व सोन्याची अंगठी असा सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज घेउन पोबारा केला. दरोडखोरांनी केलेल्या मारहाणी मध्ये शिवाजी माने व शारदा माने हे दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेने पुसेसावळी परिसरात एकच दहशत निर्माण झाली असुन दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून दरोडेखोरांचे ठसे घेतले असून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, पोलिस उपअधीक्षक धिरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कुंभार आदींनी भेट देऊन पाहणी केली.

No comments