Header Ads

पुसेसावळीत तीन दिवसीय गटशेती कृषी प्रशिक्षण शिबिर संपन्न ; गटशेती काळाची गरज : धैर्यशील कदम khatav

पुसेसावळी : शेती व्यवसायात प्रगती करण्यासाठी शेतक-यांनी संघटीत होउन गटशेतीला प्राधान्य द्यावे, पारंपरिक शेतीला फाटा देत शेतक-यांनी एकत्रित येउन शेती करणे खुप गरजेचे आहे. संघटितपणा मुळेच शेती क्षेत्रात भेडसावणा-या समस्या सोडवण्यास मदत होईल, तसेच शासन राबवत असलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन वर्धन अॅग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले. पुसेसावळी ता.खटाव येथे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाअंतर्गत पुसेसावळी येथे शेतक-यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी कृषी पर्यवेक्षक आटपाडकर, प्रशिक्षक गणेश शेलार, स्वप्निल कणसे, उपसरपंच सुरेशबापु पाटील, प्रगतशील शेतकरी मानसिंगराव माळवे, अरविंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम उपस्थित होते.

धैर्यशील कदम म्हणाले, गटशेती ही शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत असून शेतक-यांनी गटशेती बाबतीतले जागृत व्हावे. शेतक-यांनी गटशेती, उत्पादक कंपनी, बाजारभाव यंत्रणा, शेतमाल विक्री व्यवस्थापन याचे प्रशिक्षण घेऊन आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाल्यास शेतकरी गटांना बाजारपेठेतील विविध संधीचा फायदाच होइल. यावेळी प्रशिक्षक गणेश शेलार यांनी गटशेती व शासकीय योजना यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नानासो कदम, जयवंत पिसे, शंकर मोहित व पुसेसावळी परिसरातील शेतकरी बहूसंख्येने उपस्थित होते.

No comments