Header Ads

टेंभू योजनेच्या पाण्यासाठी भर उन्हात १५ किलोमीटर पायी प्रवास करत आक्रोश मोर्चा karad

कराड : टेंभू योजनेच्या हक्काच्या पाण्यासाठी शामगावकर आक्रमक झाले असून त्यांनी गुरुवारी शामगाव ते कराड असा पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करत तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गेल्या अनेक दिवसांपासून शामगावकर ग्रामस्थ टेंभूच्च्या पाण्यासाठी राजकीय गट बाजूला सारून एकवटले आहेत. त्यांनी नामदार नितीन बानगुडे पाटील, जिल्हाधिकरी, प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन टेंभूचे पाणी मिळावे अशी मागणी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गुरुवारी शामगाव ते कराड पायी प्रवास करत तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनात महिला, युवक, जेष्ठ नागरिक यांच्यासह हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते. हा मोर्चा कृष्णा कॅनाल वरून कृष्णा नाक्यावर आला, तिथून कन्याशाळा मार्गे चावडी चौक व यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ गेला येथून बाजारपेठेच्या मुख्य रस्त्याने दत्त चौक चौकातून कराड तहसील कार्यालयावर गेला. यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला.

No comments