Header Ads

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार हे बाराबलुतेदार, आलुतेदार व भटक्या विमुक्त जातीचे सामान्य माणसं ठरवतील : कल्याणराव दळे karad

उंब्रज : आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता कोणात्या पक्षाची येणार हे बाराबलुतेदार, आलुतेदार, भटक्या विमुक्त जातीचे सामान्य माणसं ठरवतील असा विश्वास व्यक्त करून आमची एकजुट हा पर्याय एक का चौथा ही आगामी निवडणूकच ठरवेल असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे राज्याचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले. उंब्रज ता. कऱ्हाड येथे बारा बलुतेदार, १८ आलुतेदार, भटके विमुक्त जाती, आदीवासी, विशेष मागासवर्ग यांच्यासह सर्व बहुजण समाज लोकशाही संकल्प संवाद सातारा जिल्हा मेळाव्यात कल्याणराव दळे बोलत होते. यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे नेते बालाजी शिंदे, सतिश कसबे, संदेश चव्हाण, सदाशिव हिवलेकर, अरुण खरमाटे, प्रा.श्री.कोपळसर, प्रा.प्रतापराव गुरव, दशरथ राऊत, अॅड.विशाल शेजवळ, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, डॉ. संजय कुंभार, शांताराम सुतार, संतोष बोंगाळे, रविंद्र गायकवाड, अरुण मोहीते, संतोष किरत, श्रीकांत भोसले, भाऊ दळवी, बापूसाहेब काशिद, शंकरराव मर्दाने, चंद्रकांत जगताप आदी उपस्थित होते.

कल्याणराव दळे म्हणाले, जे आता बजेट झाले ते जातीवरती बजेट झाले. मग नेमकं येथे जातीवाद निर्माण होतोय की साम्यवाद हा चिंतेचा विषय आहे. बारा बलुतेदारांना १०० कोटी निधी बजेट मध्ये जाहीर झाला आहे. मात्र या तीन महिण्यात जर १०० कोटी मधील १ रूपया जर आपल्याला मिळाला तर आम्ही तुमचे गुलाम होवू. या आपल्या सर्वसामान्य समाज्याला न्याय देणारा , स्वाभिमान जागृत करणारा आणि स्वास्थ देणारा इतिहासात नोंद ठरणारा हा सातारा जिल्हयाचा मेळावा ठरेल .असे राज्यातील प्रत्येक जिल्हयात जावून लोकशाही संकल्प संवाद मेळावा घेवून समाज जागृत होवून एकसंघ राहून निश्चितच न्याय मिळेल. बारा बलुतेदार प्रत्येक गावांगावांत आहे. त्यामुळे आमची जणगणना होणे महत्वाची असल्याचेही त्यांनी सांगीतले. यावेळी उपस्थित नेत्यांनी आजही आपापल्या  समाज्यांची अवस्था किती गंभीर आणि भयंकर आहे याच्या व्यथा मांडून सोडविण्यासाठी आजही प्रयत्न अपुरे असल्याचे स्पष्ट केले.प्रा. विठठल माने यांनी सुत्रसंचालन केले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष साळुंखे यांनी आभार मानले.  भानुदास वास्के, विठठल महाराज गायकवाड, सदाभाऊ सपकाळ, अंबादास दळवी, अजय काशिद, किशोर काशिद,जीवन मसुलकर, प्रकाश वास्के, संतोष सपकाळ, दत्तात्रय दळवी, पोपटराव गायकवाड, किसनराव पवार, राजेंद्र निकम, पांडूरंग राऊत, रमेश पवार, नितीन  साळुंखे , मनोज वास्के,श्री संजय जाधव, संभाजी माने, संभाजी काशिद, आनंदराव राऊत आदी उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने  गर्दी झाली होती.

No comments