Header Ads

'EVM हटावो, देश बचावो' ; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन satara

सातारा : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी महाराष्ट्रभर 'EVM हटावो, देश बचावो' पुकारले आहे. त्यानुसार सातारा जिल्हा आणि तालुक्यातील मुख्यालयांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे अशोक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना विधानसभा निवडणुकित बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश भिसे, जयवंत कांबळे, भरत लोकरे, संदीप कांबळे, विशाल भोसले, सुधाकर काकडे, विजय गडांकुश, दीपक धडचीरे यांसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.

No comments