Header Ads

वाईच्या एकास फसवणूकप्रकरणी कोठडी crime

सातारा : सातारा येथील एमआयडीसीतील एका उद्योजकाला १२५ कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगून त्याची फसवणूक करणाऱ्या वाईच्या एकास सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अटक केली. अजित सिताराम गायकवाड (वय ६१, सध्या रा. ठाणे. मूळ रा. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित उद्योजकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

No comments