Header Ads

मिरज येथील मुलाचा साताऱ्यात बुडून मृत्यू crime

सातारा : उरमोडी येथील शहापूर बंधाऱ्यात पोहताना दम लागल्याने सांगली जिल्ह्यातील मिरज येथील एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. ३१ रोजी दुपारी घडली. सौमित्र परशुराम जोशी (वय १४, रा. मिरज, सांगली) असे या मुलाचे नाव असून पोहताना दम लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्याला त्याचे मित्र व मामाने उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णलयातून देण्यात आली.

No comments