Header Ads

साताऱ्यातील मटका चालविणारे तिघे जिल्ह्यातून पडीपार crime

सातारा : शहरातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगार चालविणाऱ्या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे. सचिन प्रल्हाद सुपेकर (वय ४२, टोळी प्रमुख, रा. गुरुवार पेठ, सातारा), दीपक मारूती पवार (वय ५८, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), पापा गेणु गवळी (वय ३६, रा. प्रतापसिंह नगर खेड, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व परिसरात मटका आणि जुगार चालवून या तिघांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव निर्माण होत होता. पोलिसांनी वेळोवेळी त्यांना सुधारण्याची संधी दिली. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून या तिघांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाली असून या तिघांना एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश पोलिस अधीक्षक सातपुते यांनी दिला आहे.

No comments