Header Ads

रस्त्यावर भेटायला बोलवून महिलेचा विनयभंग crime

सातारा : आकाशवाणी केंद्र सातारा येथे रस्त्यावर भेटायला बोलवून एकाने एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप बाळू बेडेकर, रा. दिव्यनगरी, सातारा याने दि. १४ रोजी आकाशवाणी केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातारा परिसरातील येथील एका महिलेला फोन करून तुला भेटायचे आहे. तू कामात आहेस तिथे स्वतःची रूम आहे. तुझ्या शेजारी कोणी आहे का अशी विचारणा करून रस्त्यावर भेटायला बोलावून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. संबंधित महिलेने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तपास पोलीस नाईक घोडके करत आहेत.

No comments