Header Ads

एकात्मीक बालविकासच्या पर्यवेक्षिका ९४८ रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात crime

सातारा : पंचायत समिती पाटण जि.सातारा येथील एकात्मिक बालविकास योजना प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका लिना साहेबराव सांळुखे रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड मुळ राहणार खालकरवाडी पो.चरेगाव ता.कराड जि. सातारा यांनी तक्रारदार यांचे सन २०१६ मधील नोकरिनिमीत्ताने प्रवास केलेल्या, प्रवासाचे प्रवास भत्ता बिल मिळवून देण्यासाठी एकुण रकमेच्या पाच टक्के रक्कमे प्रमाणे ९४८ रूपये लाचेची मागणी केली होती. ती लाच स्विकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटण पंचायत समितीकार्यालयात रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे एकात्मिक बालविकास प्रकल्प पाटण पंचायत समिती येथे काम करतात. त्यांनी २०१६ मध्ये केलेल्या प्रवास भत्याचे बिल १८ हजार ९७८ रूपये झाले होते. ते बिल मंजूर करण्यासाठी पर्यवेक्षिका लिना साहेबराव साळुंखे यांनी एकुण रकमेच्या पाच टक्के रक्कम ९४८ रूपये लाच म्हणून मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाईत लाच मागितल्याची खात्री करून घेतली. सोमवार दिनांक ३ रोजी पाटण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात श्रीमती लिना साळुंखे यानी ९४८ रूपयाची लाच स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात पाटण पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण,तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के,सहाय्यक फौ. आनंदराव सपकाळ, पो.ह भरत शिंदे, शंभु संकपाळ, संजय साळुंखे, अजित करणे, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, निलेश वायदंडे, तुषार भोसले, शितल सपकाळ यांनी केली.

No comments