Header Ads

बिचुकले चेक बाऊन्स प्रकरणात सुटला अन् खंडणीच्या गुन्ह्यात पुन्हा अडकला crime

सातारा : चेक बाऊन्सप्रकरणी सातारा पोलिसांनी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी स्पर्धेचा सदस्य अभिजित बिचुकले याची सातारा कारागृहात रवानगी केली आहे. शनिवारी बिचुकलेला न्यायालयात हजर केले असता चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, 2012 मधील खंडणी प्रकरणात त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याची रवानगी आता प्रिझन वॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

28 हजारांच्या चेक बाऊन्सप्रकरणी अ‍ॅड. संदीप सपकाळ यांनी अभिजित बिचुकले विरोधात तक्रार दिली होती. यामध्ये त्याला जामीनही मिळाला होता. मात्र, न्यायालयीन कामकाजावेळी तो गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायमूर्ती यांनी बिचुकलेला अटक करून हजर  करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले. त्यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सातारा एलसीबीच्या टीमने बिचुकले याला बिग बॉसच्या सेटवरूनच अटक करण्यात आली होती. परंतु, पोलिसांना येण्यास वेळ लागल्याने बिचुकलेला शहर पोलिसांच्या ताब्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्याचा रक्‍तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. त्याची तपासणी करून तो फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सकाळी 11 वाजता त्याला न्यायालयात हजर केले. न्यायमूर्ती आर. व्ही. पाटील यांच्यासमोर बिचुकलेचेच्यावतीने अ‍ॅड. शिवराज धनावडे तर फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. संदीप सपकाळ यांनी स्वत: युक्‍तिवाद केला. यावेळी न्यायालयाने बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला. मात्र, 2012 मध्ये फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातही बिचुकले हा न्यायालयीन कामकाजात हजर राहत नव्हता. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. अभिजीत बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का? याची पडताळणी केली असता खंडणी प्रकरणात त्याला वॉरंट बजावले असल्याचे समोर आले. त्यामुळेच त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

No comments