Header Ads

बेकायदा पिस्टल बाळगणारा जेरबंद crime

सातारा : सातारा येथील पोवई नाक्यावर मंगळवारी बेकायदा अग्निशस्त्र (पिस्टल) स्वत:जवळ बाळगून फिरत असलेला रूपेश संजय वारे (वय 20 रा.कालगाव ता.कराड.जि.सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून एक पिस्टल व दोन जीवंत काडतूसे असा सुमारे 66 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कराड येथून साताराकडे येणार्‍या बसमध्ये हिरव्या रंगाचा टिशर्ट व निळ्यारंगाची पॅट परिधान केलेला इसम पिस्टल व काडतूस घेवुन साताराकडे येत असल्याची माहित पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जर्हाड यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार केले. या पथकाने सातारा बसस्थानक येथे मंगळवारी सायंकाळी सापळा लावला. परंतु, रूपेश संजय वारे पोवई नाक्यावरील पेंढारकर हॉस्पिटलच्या समोर उतरला. ही बस सातारा बसस्थानकात आल्यानंतर पोलीसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये संबधित वर्णनाचा इसम आढळून आला नाही. त्यामुळे पोलीसांनी सातारा बसस्थानक व पोवईनाका परिसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी हिरव्या रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची पॅट घातलेला तरूण त्यांना पोवईनाका परिसरात आढळला. त्याला ताब्यात घेवून झडती घेतली असता सुमारे 66 हजार किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतूसे मिळून आली. याप्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या सुचनांनूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जर्हाड, हवालदार सिध्देश्वर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, मुनिर मुल्ला, विक्रम पिसाळ, विशाल पवार, निलेश काटकर, पंकज बेसके, यांनी केली.

No comments