Header Ads

बहिणीला त्रास देऊ नको सांगण्यास गेलेल्या भावंडांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण crime

सातारा : बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगण्यास गेलेल्या दोन भावांना आठजणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना प्रतापसिंह नगर येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आठजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी लक्ष्मण भालेराव, नंदू भालेराव, नितीन भालेराव, ओमकार भालेराव, विमल भालेवराव, मयूर तुपारे, ओंमकारची आई, संजय भालेराव (सर्व रा. प्रतापसिंह नगर खेड, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर अशोक लंकेश्वर (वय १७) आणि संतोष लंकेश्वर (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांच्या बहिणीला काहीजण त्रास देत होते. त्यामुळे हे दोघे संबंधितांना आमच्या बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगण्यास गेले. त्यावेळी वरील संशयितांनी लंकेश्वर भावंडांना लाकडी दांडके व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही भाऊ जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून, सागर लंकेश्वरने रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम प्रतापसिंह नगरामध्ये पाठविली होती. काही संशयितांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे.

No comments