Header Ads

दरोडयाच्या तयारीतील सहा संशयित औंध पोलिसांकडून ताब्यात crime

सातारा : वडूज ते पुसेसावळी मार्गावर पळशीनजीक असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ आज, मंगळवार (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून शामगाव घाटाकडे निघालेल्या सहा दरोडेखोरांना औंध पोलिसांनी अटक केली. मागील चार दिवसांपूर्वी अंभेरी घाटात एकास लुटून मारहाण केल्याचे यावेळी समोर आले आहे. तर, खटाव तालुक्यातील अन्य पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता औंध पोलिसांनी यावेळी वर्तवली आहे. गोपूज, पळशीमार्गे काहीजण शामगाव घाटात लुटमार करण्यासाठी जाणार असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली. यावेळी आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास औंध पोलिसांनी एफझेड गाडीवरून निघालेल्या दोन जणांना तर त्यांनी दिलेल्या माहितीवरून अन्य चौघांना अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेतले. तर अन्य दोन जण फरार झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या सहकार्याने सपोनि व्ही.डी.बडवे, पोलिस हवालदार प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलिक कटरे, सी.डी.शिंदे, एस.एस.पोळ, पी.टी.यादव यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.

No comments