Header Ads

दोन चोऱ्यांत पाच लाखांचा ऐवज लंपास crime

सातारा : सातारा शहर आणि ठोसेघर येथे दोन ठिकाणी चारचाकीच्या काचा फोडून पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. यापैकी पहिली घटना शहरातील ग्रीन फील्ड हॉटेल परिसरात घडली तर दुसरी घटना ठोसेघर येथे घडली.

याबाबत सातारा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अश्विनी महादेव सुर्यवंशी (वय ५0, मूळ रा. पाटण. सध्या रा. जोगेश्­वरी, मुंबई) या शनिवारी सातारा येथे आल्या होत्या. आपली कार पार्किंग करुन त्या कुटुंबियासोबत साताऱ्यातील हॉटेल ग्रीन फील्ड येथे थांबल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडून आतील पर्समधील ३.३0 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ६0 हजार रुपये रोख रक्कम व १५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४.५0 लाखांचा रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुसरी घटना ठोसेघर येथे घडली असून याबाबतची तक्रार शुभम अनिल पाचंगे (वय २२, रा. शनिवार पेठ, सातारा) या युवकाने दिली आहे. शुभम शनिवारी ठोसेघर येथे गेला होता. यावेळी चोरट्यांनी त्याच्या गाडीची काच फोडून टॅब, रोख रक्कम असा सुमारे ३१ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत तक्रार त्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

No comments