Header Ads

मुलास मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार crime

सातारा : मुलास मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून सातारा तालुक्यातील एका महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की  संतोष आनंद सूर्यवंशी (वय २६) रा. करंजे पेठ, ता. सातारा याने सातारा तालुक्‍यातील एका महिलेला तिच्या मुलास मारण्याची धमकी देऊन तिला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून दि. ७ जून २०१९ रोजी ६.३० वाजता ते  १४ जून २०१९ रोजी ७. ३० वाजण्याच्या दरम्यान बस स्थानक सातारा व करंजे पेठ, सातारा येथील पत्र्याच्या शेडमध्ये तिला घेऊन जाऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेने याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख करीत आहेत.

No comments