Header Ads

मांडूळ तस्करीप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक ; ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त crime

सातारा : मांडूळ तस्करीप्रकरणी सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाच्या पथकाने दोघांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी मांडूळ, इनोव्हा असा एकूण  56 लाख 16 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. संशयित युवक हे सातारा तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत चंद्रकांत महाडीक (वय 20), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी महामार्गावरील शेंद्रे ता.सातारा येथे मांडूळ तस्करीसाठी घेवून जात असल्याची सातारा तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ एक पथक तयार करुन महामार्गावर सापळा रचला. यावेळी महामार्गावर एक इनोव्हा कार संशयास्पदरीत्या जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कार अडवली. कारमध्ये तिघेजन होते. संशयितांना त्यांची नावे विचारल्यानंतर त्यांनी त्यांची नावे सांगितली.

संशयित युवकांकडे बॅग असल्याने पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये मांडूळ जातीचा सर्प आळढला. पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यानंतर ते विक्री करण्यासाठी घेवून जात असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, निनाम गावात या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी जप्त केलेले मांडूळ वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, पोनि अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलिस हवालदार उत्तम कोळी, सुजीत भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार वनविभागाचे शितल राठोड, शंकर आवळे, श्रीकांत वसावे, सुहास भोसले, प्रशांत पडवळ यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

No comments