Header Ads

21 जून, योग दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत राबवणार : डॉ. रविंद्र भारती- झुटिंग satara

सातारा : २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. भारत सरकारचे आयुष मंत्रालय व इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑगनायझेशन, दिल्ली (आयएनओ) यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतात योग दिवस मोठया प्रमाणात, मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सातारा जिल्हा इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑगनायझेशनच्या वतीने 15 ते 21 जून या कालावधीत सातारा जिल्ह्यात योग शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून या वर्षी जिल्ह्यात एक लाख लोकांनकडून योग करुन घेण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहीती सातारा जिल्हा इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑगनायझेशनचे अध्यक्ष डॉ. रविंद्र भारती- झुटिंग यांनी दिली. ते योग शिक्षकांना योगदिनानिमित्त योग शिबीर घेण्यासाठी आवश्यक असणारे टि शर्ट, बॅर्नर, योगदिवस प्रोटोकाल पुस्तिका वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑगनायझेशनच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. पल्लवी दळवी, सातारा जिल्हा समन्वयक डॉ. रविकुमार कोठाळे, डॉ. पुरब आनंदे हे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भारती पुढे म्हणाले, मागील वर्षी सातारा जिल्ह्यात 88 योग शिक्षकांच्या मदतीने 56 हजार लोकांडून योग करुन घेण्यात आला होता. यातील अनेकजन आजही सातत्याने योग करत आहेत. यावेळी 148 योग शिक्षकांची जिल्ह्यातून नोंदणी झाली असल्याने एक लाखापेक्षा जास्त नागरीकांकडून योग करुन घेणे शक्य होणार आहे. 15 ते 21 दम्यान होणार्‍या योग शिबीरात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे व योग दिवस यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे अहवान डॉ. पल्लवी दळवी यांनी केले. कार्यक्रमाला विद्या जाधव, शंकर केंजळे, महेश चव्हाण, सचिन पुराणिक, बाळासाहेब निंबाळकर, डॉ. समाधान कदम, पी. एस. भिलारे, सुनंदा कट्टे, सुभाष यादव यांचे सह योग शिक्षक व आयएनओ सदस्य उपस्थितीत होते.

No comments