Header Ads

लोकसभेच्या निकालासाठी उरले आठ दिवस ; उदयनराजे ४ लाख मतांनी तर नरेंद्र पाटील २ लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार असाल्याचा समर्थकांचा दावा satara

सातारा : लोकसभेच्या निकालासाठी आता केवळ आठ दिवस उरले आहेत. देशभरातील लोकसभेचा २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीत देशासह राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र विद्यमान खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून खा.उदयनराजे तब्बल ४ लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी उमेदवार नरेंद्र पाटील २ लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचे भाकीत महायुतीच्या समर्थकांकडून केले जात आहे. मात्र खा.श्री.छ.उदयनराजे भोसले ४ लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येतात की नरेंद्र पाटील २ लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येतात हे २३ तारखेलाच सातारकरांना समजेल. 

No comments