Header Ads

नको गुलाल....नको मिरवणुका....जवळवाडी ग्रामस्वच्छतेसाठी झाडु घेवु हाती आता ; जवळवाडी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम satara

सातारा : जवळवाडी ग्रामपंचायतीच्या नुतन कार्यकारणीची आज बुधवार दि. ८ मे २०१९ रोजी सकाळी ११ वाजता उपसरपंच पदाच्या निवडीची पहिली सभा संपन्न झाली. उपसरपंच पदाच्या निवडीनंतर लगेचच सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी हातामध्ये झाडु घेत ग्रामपंचायत कार्यालय व श्री.भैरवनाथ मंदिर परिसराची स्वच्छता करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. निवडणुका कोणत्याही असो निकालानंतर मिरवणुका, गुलाल, फटाके, वाद्य या सर्व गोष्टींना फाटा देत जवळवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्वच्छतेचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नको गुलाल....नको मिरवणुका...जवळवाडी ग्रामस्वच्छतेसाठी झाडु घेवु हाती आता हाता... असा संदेश देत गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जावळे, राजेंद्र निकम, सुरेखा मर्ढेकर, शांताबाई जवळ तसेच गावातील आण्णासाहेब धनावडे, सुरेशबुवा जवळ, विलासबाबा जवळ, शंकर जवळ, बाळासाहेब जवळ, सतिष मर्ढेकर, अशोक जवळ, विजय धनावडे, बबन जवळ, अनिल जवळ, सुनिल जवळ आदी मान्यवर व ग्रामस्थ ऊपस्थित होते.

No comments