Header Ads

एसी बसवायला आले... अन्‌ चोरी करून गेले ; सातारा शहरातील मंगळवार पेठेतील घटना satara

सातारा : सातारा शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात एसी बसवायला आलेल्या दोन कर्मचाऱ्यांनीच चक्क तीन लाखांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली. याप्रकरणी सुवर्णा विश्‍वास देशपांडे रा.बालाजी आर्पाटमेंट, मंगळवार पेठ सातारा यांनी शहरातील अजिंक्‍य एसी सर्व्हीसेस यांच्या दोन कामगांराच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या घराजवळ दि.१० रोजी अजिंक्‍य एसी सर्व्हीसेस या दुकानाचे कामगार एसी फिटींग करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या दोन अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या बेडरुममधे असलेल्या ड्रेसींगचा दरवाजा उघडून चोरी केल्याचा संशय तक्रारदारांना आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चोरट्यांनी पाच तोळे वजनाच्या पाटल्या, तीन तोळे वजनाचे मंगळसुत्र, तीन ग्रॅम सोन्याची आंगठी, दोन तोळे वजनाचे मिनी गंठण, एक तोळे वजनाचे सोन्याचे पॅन्डल, चांदीची जोडवी व पैजंण असा सुमारे ३ लाख ८३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करत आहेत.

No comments