Header Ads

सराफ कट्टा अक्षय्य तृतीयेला गजबजला satara

सातारा : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. तसेच भावही स्थिर राहिल्याने साताऱ्याचा सराफ कट्टा मंगळवारी गजबजला. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी वाढल्याने सराफ व्यावसायिकांचा उत्साह दुणावला.

मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. यादिवशी प्रामुख्याने सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे काही दिवस आधीपासून लोक सोने खरेदीसाठी बुकींग करून ठेवतात. मागील काही वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत चालली आहेत. त्यासाठी सराफी व्यावसायिकांकडूनही सुवर्ण भिशी सारख्या आकर्षक ऑफर आणल्या जातात. यंदा सराफी बाजारात अक्षय्य तृतीयेचा उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल अधिक होण्याची शक्‍यता आहे. सुमारे दोन वर्षे बाजारात काही प्रमाणात मंदीची स्थिती होती. त्यामुळे खरेदी मंदावली होती. यंदा मात्र खरेदीत होत असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यावर कळस चढला असे व्यावसायिकांनी सांगितले. साताऱ्यात सराफी कट्ट्यांवर नाजूक कलाकुसरीच्या दागिन्याप्रमाणे मध्यमवर्गीयांना आकर्षित करणाऱ्या वेढणे खरेदीच्या योजना ठेवण्यात आल्या होत्या. वेढणे खरेदीत झळ व मजुरी दोन्ही अगदी नगण्य असल्याने व माफक दरामुळे त्या खरेदीला पसंती दिली गेली. दागिन्याच्या या प्रकारात सव्वा ते दीड कोटीची उलाढाल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments